koha Training Videos (Marathi)

koha Training Videos (Marathi)

Acquisition (Marathi)

ग्रंथालयाचे सामर्थ्य हे मुख्यतः ग्रंथालयातील ज्ञान साधनांच्या संग्रहावर अवलंबून असते. आणि हा संग्रह उभारण्याचे , त्याचे नियोजन करण्याचे कार्य हे acquisition प्रक्रियेद्वारे पार पडते. हा अतिशय महत्वाचा आणि प्रथम टप्पा असून यामध्ये budget तयार करणे, पुस्तकांची खरेदी करणे ,अशा इतर प्रक्रियांचाही समावेश होतो. ही प्रक्रिया आधुनिक पद्धतीने पार पाडता यावी याकरिता koha library automation software प्रभावी यंत्रणा प्रदान करते. या विडिओ मध्ये आपण कोहा द्वारे acqusition कसे करता येईल हे जाणून घेऊया .

Cataloging - Part I

एक ग्रंथपाल म्हणून आपल्या ग्रंथालयातील पुस्तके व इतर वाचनपर सामग्रीचे जतन करणे आणि आपल्या वाचकांना ते अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे हि आपलीच जबाबदारी आहे. त्याकरिता आपण cataloguing करतो. या विडिओमध्ये आपण ‘कोहा’ या library automation software द्वारे आपल्या ग्रंथालयातील पुस्तकाचे cataloguing कसे करायचे हे जाणून घेणार आहोत.

Cataloging - Part I

catalgouing करून झाल्यानंतर त्यातील रेकॉर्ड किंवा item स्वरूपातील माहितीमध्ये बदल करायचा असेल तर तो कसा करता येईल हे आता आपण पाहूया. सर्वप्रथम ज्या पुस्तकाच्या माहितीमध्ये बदल करायचे आहेत ते पुस्तक आपल्याला catlagoue मध्ये शोधावे लागेल. त्यानंतर तिथे असलेल्या edit टॅब वर क्लिक करा. जर आपल्याला पुस्तकाच्या रेकॉर्ड मध्ये म्हणजेच title, author, publication, edition आणि अशा इतर माहितीमध्ये बदल करायचे असतील तर edit record हा पर्याय निवडा.आपल्याला आवश्यक अशा माहितीमध्ये बदल करून झाल्यावर ती माहिती save करा.

Serial Management

नियतकालिके, मासिके, जर्नल्स, किंवा सिरिअल्स इत्यादी आपल्या ग्रंथालयातील महत्वाचे घटक आहेत. त्यांचे subscription नियंत्रित करणे, issues स्विकारणे , त्यांचा रेकॉर्ड maintain करणे, आणि त्यांचे subscription renew करणे अशी आणि संबंधित इतर कामे कोहाच्या मदतीने सुलभ झाली आहेत. कोहा मधील serials या module चा उपयोग करून आपण ग्रंथालयात नियमित स्वरूपात येणारे जर्नल्स, वर्तमानपत्रे आणि अशा इतर साहित्याचा मागोवा घेऊ शकतो.

Circulation Module

या व्हिडिओमध्ये आपण circulation कसे करायचे हे जाणून घेणार आहोत. ग्रंथालयातील users आणि पुस्तकांचा रेकॉर्ड तयार केल्यांनतर आपली पुढची पायरी म्हणजे ग्रंथालयातील items चे issue आणि return पार पाडणे. कोहामधील circulation module द्वारे लायब्ररी मटेरिअल्स केवळ चेक इन आणि चेक आऊट करता येत नाही तर items रिन्यू करणे , users चे fine generate करणे , त्यांच्याकडून fine गोळा करणे त्याचप्रमाणे आतापर्यंतची त्यांची circulation हिस्टरी चेक करणे इत्यादी कार्ये ही पार पडता येतात.

Tools module

कोहा सॉफ्टवेअर आपल्याला patrons, circulation, कॅटलॉग आणि काही इतर घटकांशी संबंधित विविध साधने आणि तंत्रे पुरवतो. या व्हिडिओमध्ये आपण कोहामधील विविध साधनांच्या तथा tools च्या मदतीने बारकोड लेबल कसे तयार करायचे, दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर कसे सेट करायचे आणि ग्रंथालयाशी संबंधीत बातमी किंवा news कशी प्रदर्शित करायची हे जाणून घेणार आहोत.

koha Administration

कोहा softwareमधील सुलभ कामकाजासाठी कोहामध्ये मूलभूत मापदंड म्हणजे basic parameters निश्चित केलेले असणे आवश्यक आहे. या व्हिडिओत आपण कोहामध्ये आपले ग्रंथालय , त्यातील विविध items , patrons इत्यादी कसे निर्माण करायचे आणि ग्रंथालयातील circulation साठी असलेले नियम कसे set करायचे हे जाणून घेणार आहोत.